YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 12

12
आध्यात्मिक दानांची विविधता व एकता
1बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.
2तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हांला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे.
3म्हणून मी तुम्हांला कळवतो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस “येशू शापित आहे”3 असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू हा प्रभू आहे” असे म्हणता येत नाही.
4कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे;
5सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभूएकच आहे;
6आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे.
7तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते.
8कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन;
9एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने;
10एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते;
11तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.
शरीरावरून घेतलेले उदाहरण
12कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे.
13कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे.1 आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत.
14कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे.
15जर पाय म्हणेल, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही.
16जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही.
17सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती?
18तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे.
19ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते?
20तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे.
21डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, “मला तुझी गरज नाही;” तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, “मला तुमची गरज नाही.”
22इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत,
23शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते;
24आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे;
25अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.
26एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.
27तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात.
28तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे,2 भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत.
29सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय?
30निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्नभिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय?
31श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हांला दाखवतो.

सध्या निवडलेले:

१ करिंथ 12: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन