YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 9:1-34

१ इतिहास 9:1-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांची त्यांच्या-त्यांच्या वंशांप्रमाणे गणती झाली; त्यांच्या वंशावळ्या इस्राएलाच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत; यहूदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशात नेले. जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते. यहूदी, बन्यामिनी, एफ्राइमी व मनश्शे ह्यांच्यापैकी जे यरुशलेमेत राहण्यास आले ते हे : ऊथय बिन अम्मीहूद बिन अम्री बिन इम्री बिन बानी; हा बानी, पेरेस बिन यहूदा ह्याच्या वंशातला होता. शिलोन्यांपैकी ज्येष्ठ पुत्र असाया व त्याचे पुत्र. जेरहाच्या पुत्रांतला यऊवेल व त्याचे सहाशे नव्वद भाऊबंद. बन्यामिनाच्या वंशातील हे : सल्लू बिन मशुल्लाम बिन होदव्या, बिन हस्सनुवा; इबनया बिन यहोराम, एला बिन उज्जी, बिन मिख्री आणि मशुल्लाम बिन शफाट्या बिन रगुवेल, बिन इबनीया, आणि त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे भाऊबंद नऊशे छप्पन्न होते. हे सर्व पुरुष आपापल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या घराण्याचे प्रमुख होते. याजकांपैकी यदया, यहोयारीब व याखीन; आणि अजर्‍या बिन हिल्कीया, बिन मशुल्लाम, बिन सादोक, बिन मरायोथ, बिन अहीटूब; हा देवाच्या मंदिराचा शास्ता होता; अदाया बिन यहोराम, बिन पशहूर, बिन मल्कीया आणि मसय बिन अदीएल, बिन यहजेरा, बिन मशुल्लाम बिन मशील्लेमीथ, बिन इम्मेर; आणखी त्यांचे भाऊबंद, त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख एक हजार सातशे साठ होते. परमेश्वराच्या मंदिराची सेवा करण्याच्या कामी हे पुरुष फार वाकबगार होते. लेव्यांपैकी शमाया बिन हश्शूब, बिन अज्रीकाम, बिन हशब्या हे मरारी कुळातले होते; आणि बक्बकार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्या बिन मीखा, बिन जिख्री, बिन आसाफ; आणि ओबद्या बिन शमाया, बिन गालाल, बिन यदूथून; आणि बरेख्या बिन आसा, बिन एलकाना; हा नटोफाथी ह्यांच्या वस्तीत राहत असे. द्वारपाळांपैकी हे : शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान, व त्यांचे भाऊबंद; शल्लूम हा त्यांचा प्रमुख होता; हे ह्या काळपर्यंत पूर्वेस राजाच्या देवडीवर देवडीवाल्यांचे काम करीत असत; लेव्यांच्या छावणीचे द्वारपाळ हेच होते. आणि शल्लूम बिन कोरे, बिन एब्यासाफ, बिन कोरह, आणि त्यांच्या पितृकुळातील त्यांचे भाऊबंद जे कोरही त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक असून ते दर्शनमंडपाचे द्वारपाळ असत; त्यांचे वाडवडील परमेश्वराच्या छावणीवरील कामदार असून द्वारपाळ असत. पूर्वीच्या काळी फिनहास बिन एलाजार हा त्यांचा सरदार असे; परमेश्वर त्यांच्याबरोबर असे. जखर्‍या बिन मशेलेम्या हा दर्शनमंडपाचा द्वारपाळ होता. सर्व द्वारपाळांच्या कामासाठी दोनशे बारा लोक निवडले होते. त्यांना दावीद व शमुवेल द्रष्टा ह्यांनी ह्या कामगिरीवर नेमले होते. त्यांच्या-त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांना नमूद केले होते. ते व त्यांचे वंशज परमेश्वराच्या मंदिराच्या म्हणजे दर्शनमंडपाच्या द्वारपाळाचे काम पाळीपाळीने पाहत असत. द्वारपाळ पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना असत. त्यांचे भाऊबंद जे खेड्यापाड्यांत राहत असत ते सात-सात दिवसांनी पाळीपाळीने त्यांच्याकडे येत; चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्यांच्याकडे हे काम सोपवले होते; त्यांना देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे ह्यांवर नेमले होते. देवाच्या मंदिराचे रक्षण त्यांच्याकडे सोपवले असल्यामुळे ते त्याच्या आसपास रात्रीचे राहत, आणि दररोज सकाळी मंदिर उघडण्याचे काम त्यांचे होते. उपासनेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काही जणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते एकेक मोजून आत ठेवत व एकेक मोजून बाहेर काढत. त्यांच्यापैकी काही जणांकडे सामान-सुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये ह्यांची व्यवस्था असे. याजकपुत्रांपैकी काही जण गांध्यांचे काम करीत. तव्यावर ज्या वस्तू भाजण्यात येत त्यांवर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी मत्तिथ्या ह्याला नेमले होते, हा शल्लूम कोरहीचा ज्येष्ठ पुत्र. कहाथी कुळातील त्यांच्या कित्येक भाऊबंदांची नेमणूक समर्पित भाकरीसंबंधीच्या कामावर झाली होती; ते प्रत्येक शब्बाथ दिवशी त्या तयार करीत. वर सांगितलेले गायक लेव्यांच्या पितृकुळातले प्रमुख होते; ते कोठड्यांत राहत; त्यांना इतर काही काम नसे; ते रात्रंदिवस आपल्या कामात गुंतलेले असत. हे त्यांच्या-त्यांच्या पिढ्यांतले, लेव्यांच्या पितृ-कुळातले प्रमुख पुरुष होत; ते यरुशलेमेत राहत.

सामायिक करा
१ इतिहास 9 वाचा

१ इतिहास 9:1-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इस्राएलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांस बाबेल येथे कैद करून नेण्यात आले. त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, नगरात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग. यरूशलेमामध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक राहत होते. ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र. यरूशलेमामध्ये राहणारे शिलोनी लोक असे, ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे पुत्र. यरूशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर सहाशे नव्वद भाऊबंद. बन्यामीन घराण्यातील लोक: सल्लू हा मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम होदव्याचा पुत्र. होदवा हस्सनुवाचा पुत्र. इबनया हा यरोहामाचा पुत्र. एला उज्जीचा पुत्र. उज्जी मिख्रीचा पुत्र. मशुल्लाम शफाट्याचा पुत्र. शफाट्या रगुवेलचा पुत्र रगुवेल इबनीया याचा पुत्र. त्याचे नातेवाइक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर नऊशें छपन्न होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. यरूशलेममधील याजक यदया, यहोयारीब, याखीन, अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा पुत्र. हिल्कीया मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम सादोकाचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा पुत्र. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकारी होता. यरोहामाचा पुत्र अदाया होता. यहोराम हा पशहूरचा पुत्र. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा पुत्र मसय. अदीएल यहजेराचा पुत्र, यहजेरा मशुल्लामचा पुत्र, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा पुत्र. असे एकंदर एक हजार सातशे साठ याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामात फार प्रवीण होते. यरूशलेममधील लेवी घराण्यातले लोक हश्शूबचा पुत्र शमाया. हश्शूब अज्रीकामचा पुत्र. अज्रीकाम हशब्याचा पुत्र. हशब्या हा मरारीच्या वंशातला. याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरूशलेमामध्ये राहत होते. मत्तन्या मीखाचा पुत्र. मीखा जिख्रीचा पुत्र. जिख्री आसाफचा पुत्र. ओबद्या शमाया याचा पुत्र. शमाया गालालचा पुत्र. गालाल यदूथूनचा पुत्र. याखेरीज आसा याचा पुत्र बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एलकानाचा पुत्र. हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता. यरूशलेममधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य. हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते. शल्लूम हा कोरे याचा पुत्र. कोरे हा एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून व्दारपालाचे काम पार पाडत होते. पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजाराचा पुत्र. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. मशेलेम्या याचा पुत्र जखऱ्या “दर्शनमंडपाचा” द्वारपाल होता. निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर दोनशे बारा निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती. आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत. या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते. देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्यासभोवती जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांच्यातले काहीजण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत. आणि त्यांच्यांतले काहीजण सामानावर व पवित्रस्थानाच्या सर्व पीठ, द्राक्षरस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य आणि साधनांची काळजी घेण्यास यावर नेमलेले होते. याजकांचे काही पुत्र सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत. लेव्यातला एक मत्तिथ्या, जो शल्लूम कोरही याचा थोरला पुत्र होता. अर्पणाच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचा प्रमुख होता. कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते. लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत होते. कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत, त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे. हे लेव्यांच्या घराण्यांतील प्रमुख होते, जशी त्यांची वंशावळ्यांमध्ये नोंद केली होती. ते यरूशलेमात राहत होते.

सामायिक करा
१ इतिहास 9 वाचा

१ इतिहास 9:1-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याप्रकारे सर्व इस्राएली लोकांच्या वंशावळ्या इस्राएलच्या व यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेल्या आहेत; या लोकांच्या अविश्वासूपणामुळे त्यांना बंदिवान करून बाबिलोन देशी नेले. जे सर्वप्रथम स्वतःच्या वतनातील आपल्या नगरात राहण्यास आले, त्यातील काही इस्राएली, याजक, लेवी व मंदिराचे सेवक होते. यहूदाह, बिन्यामीन, एफ्राईम व मनश्शेह यांच्यापैकी जे यरुशलेममध्ये राहण्यास आले: ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता. शिलोनी वंश: त्याचा ज्येष्ठपुत्र असायाह व त्याचे पुत्र. जेरही वंश: यऊवेल. यहूदाहचे 690 लोकही आले. बिन्यामीन वंशातून: सल्लू जो मशुल्लामाचा पुत्र, जो होदव्याहचा पुत्र व जो हस्सनुआहाचा पुत्र; इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र; एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र; मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र; वंशावळीत नोंद झालेल्या बिन्यामीन लोकांची एकूण संख्या 956 होती. हे सर्व लोक कुटुंबप्रमुख होते. याजकातील: यदायाह; यहोयारीब; याखीन; अजर्‍याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता; अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता; मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र. जे कुटुंबप्रमुख होते, त्या 1,760 याजकांची नोंद झाली. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवाकार्यास हे पुरुष जबाबदार होते. लेवींमधून: शमायाह जो हश्शूबचा पुत्र, जो अज्रीकामचा पुत्र, जो हशब्याहाचा पुत्र. हे मरारी वंशाचे होते; बकबक्कार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्याह जो मीखाहचा पुत्र, जो जिक्रीचा पुत्र, जो आसाफचा पुत्र; ओबद्याह जो शमायाहचा पुत्र, जो गालालचा पुत्र, जो यदूथूनचा पुत्र; जो बेरेख्याहचा पुत्र, जो आसाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो नटोफाथीच्या वस्तीत राहत असे. द्वारपाल: शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान व त्यांचे लेवी भाऊबंद. शल्लूम त्यांचा प्रमुख होता; आजवर ते राजाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर कार्यरत आहेत; लेवींच्या छावणीचे द्वारपाल हेच होते. शल्लूम जो कोरेचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहचा पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील त्याचे द्वारपाल भाऊबंद जे कोरही होते, त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक केलेली असून, ते त्यांच्या पूर्वजांसारखे याहवेहच्या भवनाच्या व्दाराची रखवाली करीत. पूर्वीच्या काळी एलअज़ारचा पुत्र फिनहास या सर्वांवर द्वारपालांचा अधिकृत अधिकारी होता. याहवेहचे सानिध्य त्यांच्याबरोबर होते. मशेलेम्याहचा पुत्र जखर्‍याह सभामंडपाचा द्वारपाल होता. द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते. ते व त्यांचे वंशज याहवेहच्या भवनाच्या म्हणजे सभामंडपाच्या द्वारपालाचे काम पाहत असत. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना द्वारपाल ठेवण्यात आले होते. त्यांच्या गावात राहणारे त्यांचे भाऊबंद सात दिवसात पाळीपाळीने कार्य करीत. परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती. परमेश्वराच्या भवनाचे रक्षण त्यांच्याकडे सोपविले असल्यामुळे रात्री ते मंदिराच्या आसपास राहत असत आणि दररोज सकाळी परमेश्वराचे भवन उघडण्यासाठी चावी त्यांच्याच ताब्यात असे. सेवेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काहीजणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते मोजून आत ठेवीत व मोजून बाहेर काढीत. त्यांच्यापैकी काहीजणांकडे सामानसुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये यांची व्यवस्था असे. याजकांपैकी काहीजण सुगंधी मसाले तयार करीत असत. तव्यावर विश्वासयोग्यतेने ज्या वस्तू भाजण्यात येत, त्यावर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी कोरही शल्लूमचा ज्येष्ठपुत्र मत्तिथ्याहला नेमले. कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती. काही लेवी कुटुंबप्रमुख जे मंदिरातील संगीतासाठी जबाबदार होते, ते मंदिराच्या काही खोल्यात राहत असत आणि त्यांना संगीताशिवाय इतर कामे नव्हती, कारण त्या कामाची त्यांना रात्रंदिवस जबाबदारी देण्यात आली होती. हे सर्व लेवी वंशातील कुटुंबप्रमुख असून त्यांची प्रमुख म्हणून वंशावळीत नोंद झाली होती, ते यरुशलेमात राहात.