YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 9

9
बाबेलहून परत आलेले लोक
(नहे. 11:1-24)
1ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांची त्यांच्या-त्यांच्या वंशांप्रमाणे गणती झाली; त्यांच्या वंशावळ्या इस्राएलाच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत; यहूदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशात नेले.
2जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते.
3यहूदी, बन्यामिनी, एफ्राइमी व मनश्शे ह्यांच्यापैकी जे यरुशलेमेत राहण्यास आले ते हे : 4ऊथय बिन अम्मीहूद बिन अम्री बिन इम्री बिन बानी; हा बानी, पेरेस बिन यहूदा ह्याच्या वंशातला होता.
5शिलोन्यांपैकी ज्येष्ठ पुत्र असाया व त्याचे पुत्र.
6जेरहाच्या पुत्रांतला यऊवेल व त्याचे सहाशे नव्वद भाऊबंद.
7बन्यामिनाच्या वंशातील हे : सल्लू बिन मशुल्लाम बिन होदव्या, बिन हस्सनुवा;
8इबनया बिन यहोराम, एला बिन उज्जी, बिन मिख्री आणि मशुल्लाम बिन शफाट्या बिन रगुवेल, बिन इबनीया, 9आणि त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे भाऊबंद नऊशे छप्पन्न होते. हे सर्व पुरुष आपापल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या घराण्याचे प्रमुख होते.
10याजकांपैकी यदया, यहोयारीब व याखीन;
11आणि अजर्‍या बिन हिल्कीया, बिन मशुल्लाम, बिन सादोक, बिन मरायोथ, बिन अहीटूब; हा देवाच्या मंदिराचा शास्ता होता;
12अदाया बिन यहोराम, बिन पशहूर, बिन मल्कीया आणि मसय बिन अदीएल, बिन यहजेरा, बिन मशुल्लाम बिन मशील्लेमीथ, बिन इम्मेर;
13आणखी त्यांचे भाऊबंद, त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख एक हजार सातशे साठ होते. परमेश्वराच्या मंदिराची सेवा करण्याच्या कामी हे पुरुष फार वाकबगार होते.
14लेव्यांपैकी शमाया बिन हश्शूब, बिन अज्रीकाम, बिन हशब्या हे मरारी कुळातले होते;
15आणि बक्बकार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्या बिन मीखा, बिन जिख्री, बिन आसाफ;
16आणि ओबद्या बिन शमाया, बिन गालाल, बिन यदूथून; आणि बरेख्या बिन आसा, बिन एलकाना; हा नटोफाथी ह्यांच्या वस्तीत राहत असे.
17द्वारपाळांपैकी हे : शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान, व त्यांचे भाऊबंद; शल्लूम हा त्यांचा प्रमुख होता;
18हे ह्या काळपर्यंत पूर्वेस राजाच्या देवडीवर देवडीवाल्यांचे काम करीत असत; लेव्यांच्या छावणीचे द्वारपाळ हेच होते.
19आणि शल्लूम बिन कोरे, बिन एब्यासाफ, बिन कोरह, आणि त्यांच्या पितृकुळातील त्यांचे भाऊबंद जे कोरही त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक असून ते दर्शनमंडपाचे द्वारपाळ असत; त्यांचे वाडवडील परमेश्वराच्या छावणीवरील कामदार असून द्वारपाळ असत.
20पूर्वीच्या काळी फिनहास बिन एलाजार हा त्यांचा सरदार असे; परमेश्वर त्यांच्याबरोबर असे.
21जखर्‍या बिन मशेलेम्या हा दर्शनमंडपाचा द्वारपाळ होता.
22सर्व द्वारपाळांच्या कामासाठी दोनशे बारा लोक निवडले होते. त्यांना दावीद व शमुवेल द्रष्टा ह्यांनी ह्या कामगिरीवर नेमले होते. त्यांच्या-त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांना नमूद केले होते.
23ते व त्यांचे वंशज परमेश्वराच्या मंदिराच्या म्हणजे दर्शनमंडपाच्या द्वारपाळाचे काम पाळीपाळीने पाहत असत.
24द्वारपाळ पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना असत.
25त्यांचे भाऊबंद जे खेड्यापाड्यांत राहत असत ते सात-सात दिवसांनी पाळीपाळीने त्यांच्याकडे येत;
26चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्यांच्याकडे हे काम सोपवले होते; त्यांना देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे ह्यांवर नेमले होते.
27देवाच्या मंदिराचे रक्षण त्यांच्याकडे सोपवले असल्यामुळे ते त्याच्या आसपास रात्रीचे राहत, आणि दररोज सकाळी मंदिर उघडण्याचे काम त्यांचे होते.
28उपासनेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काही जणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते एकेक मोजून आत ठेवत व एकेक मोजून बाहेर काढत.
29त्यांच्यापैकी काही जणांकडे सामान-सुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये ह्यांची व्यवस्था असे.
30याजकपुत्रांपैकी काही जण गांध्यांचे काम करीत.
31तव्यावर ज्या वस्तू भाजण्यात येत त्यांवर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी मत्तिथ्या ह्याला नेमले होते, हा शल्लूम कोरहीचा ज्येष्ठ पुत्र.
32कहाथी कुळातील त्यांच्या कित्येक भाऊबंदांची नेमणूक समर्पित भाकरीसंबंधीच्या कामावर झाली होती; ते प्रत्येक शब्बाथ दिवशी त्या तयार करीत.
33वर सांगितलेले गायक लेव्यांच्या पितृकुळातले प्रमुख होते; ते कोठड्यांत राहत; त्यांना इतर काही काम नसे; ते रात्रंदिवस आपल्या कामात गुंतलेले असत.
34हे त्यांच्या-त्यांच्या पिढ्यांतले, लेव्यांच्या पितृ-कुळातले प्रमुख पुरुष होत; ते यरुशलेमेत राहत.
शौलाची वंशावळ
35गिबोनात गिबोनाचा बाप यहीएल राहत होता, ह्याच्या बायकोचे नाव माका;
36आणि त्यांचे पुत्र : ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नेर, नादाब,
37गदोर, अह्यो, जखर्‍या व मिकलोथ.
38मिकलोथाला शिमाम झाला; हेही यरुशलेमेत आपल्या भाऊबंदांजवळ त्यांच्यासमोर राहत असत.
39नेरास कीश झाला, कीशास शौल झाला, शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल हे झाले.
40योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बालास मीखा झाला.
41मीखाचे पुत्र पीथोन, मेलेख व तहरेया.
42आहाजास यारा झाला, यारास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री हे झाले, जिम्रीस मोसा झाला.
43मोसास बिना झाला, त्याचा पुत्र रफाया, त्याचा पुत्र एलासा, त्याचा पुत्र आसेल;
44आणि आसेलास सहा पुत्र झाले, त्यांची नावे ही : अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्‍या, ओबद्या व हानान, हे आसेलाचे पुत्र.

सध्या निवडलेले:

१ इतिहास 9: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन