1 इतिहास 9
9
1याप्रकारे सर्व इस्राएली लोकांच्या वंशावळ्या इस्राएलच्या व यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेल्या आहेत; या लोकांच्या अविश्वासूपणामुळे त्यांना बंदिवान करून बाबिलोन देशी नेले.
यरुशलेमचे रहिवासी
2जे सर्वप्रथम स्वतःच्या वतनातील आपल्या नगरात राहण्यास आले, त्यातील काही इस्राएली, याजक, लेवी व मंदिराचे सेवक होते.
3यहूदाह, बिन्यामीन, एफ्राईम व मनश्शेह यांच्यापैकी जे यरुशलेममध्ये राहण्यास आले:
4ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता.
5शिलोनी वंश:
त्याचा ज्येष्ठपुत्र असायाह व त्याचे पुत्र.
6जेरही वंश:
यऊवेल.
यहूदाहचे 690 लोकही आले.
7बिन्यामीन वंशातून:
सल्लू जो मशुल्लामाचा पुत्र, जो होदव्याहचा पुत्र व जो हस्सनुआहाचा पुत्र;
8इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र;
एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र;
मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र;
9वंशावळीत नोंद झालेल्या बिन्यामीन लोकांची एकूण संख्या 956 होती. हे सर्व लोक कुटुंबप्रमुख होते.
10याजकातील:
यदायाह; यहोयारीब; याखीन;
11अजर्याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता;
12अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता;
मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र.
13जे कुटुंबप्रमुख होते, त्या 1,760 याजकांची नोंद झाली. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवाकार्यास हे पुरुष जबाबदार होते.
14लेवींमधून:
शमायाह जो हश्शूबचा पुत्र, जो अज्रीकामचा पुत्र, जो हशब्याहाचा पुत्र. हे मरारी वंशाचे होते;
15बकबक्कार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्याह जो मीखाहचा पुत्र, जो जिक्रीचा पुत्र, जो आसाफचा पुत्र;
16ओबद्याह जो शमायाहचा पुत्र, जो गालालचा पुत्र, जो यदूथूनचा पुत्र;
जो बेरेख्याहचा पुत्र, जो आसाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो नटोफाथीच्या वस्तीत राहत असे.
17द्वारपाल:
शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान व त्यांचे लेवी भाऊबंद. शल्लूम त्यांचा प्रमुख होता; 18आजवर ते राजाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर कार्यरत आहेत; लेवींच्या छावणीचे द्वारपाल हेच होते.
19शल्लूम जो कोरेचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहचा पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील त्याचे द्वारपाल भाऊबंद जे कोरही होते, त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक केलेली असून, ते त्यांच्या पूर्वजांसारखे याहवेहच्या भवनाच्या व्दाराची रखवाली करीत.
20पूर्वीच्या काळी एलअज़ारचा पुत्र फिनहास या सर्वांवर द्वारपालांचा अधिकृत अधिकारी होता. याहवेहचे सानिध्य त्यांच्याबरोबर होते.
21मशेलेम्याहचा पुत्र जखर्याह सभामंडपाचा द्वारपाल होता.
22द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती.
विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते. 23ते व त्यांचे वंशज याहवेहच्या भवनाच्या म्हणजे सभामंडपाच्या द्वारपालाचे काम पाहत असत. 24पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना द्वारपाल ठेवण्यात आले होते. 25त्यांच्या गावात राहणारे त्यांचे भाऊबंद सात दिवसात पाळीपाळीने कार्य करीत. 26परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती. 27परमेश्वराच्या भवनाचे रक्षण त्यांच्याकडे सोपविले असल्यामुळे रात्री ते मंदिराच्या आसपास राहत असत आणि दररोज सकाळी परमेश्वराचे भवन उघडण्यासाठी चावी त्यांच्याच ताब्यात असे.
28सेवेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काहीजणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते मोजून आत ठेवीत व मोजून बाहेर काढीत. 29त्यांच्यापैकी काहीजणांकडे सामानसुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये यांची व्यवस्था असे. 30याजकांपैकी काहीजण सुगंधी मसाले तयार करीत असत. 31तव्यावर विश्वासयोग्यतेने ज्या वस्तू भाजण्यात येत, त्यावर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी कोरही शल्लूमचा ज्येष्ठपुत्र मत्तिथ्याहला नेमले. 32कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती.
33काही लेवी कुटुंबप्रमुख जे मंदिरातील संगीतासाठी जबाबदार होते, ते मंदिराच्या काही खोल्यात राहत असत आणि त्यांना संगीताशिवाय इतर कामे नव्हती, कारण त्या कामाची त्यांना रात्रंदिवस जबाबदारी देण्यात आली होती.
34हे सर्व लेवी वंशातील कुटुंबप्रमुख असून त्यांची प्रमुख म्हणून वंशावळीत नोंद झाली होती, ते यरुशलेमात राहात.
शौलाची वंशावळ
35गिबोनचा#9:35 किंवा सेनानायक पिता ईयेल गिबोन येथे स्थायिक झाला.
त्याच्या पत्नीचे नाव माकाह होते. 36त्याच्या पुत्रांची नावे अशी: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब, 37गदोर, अहियो, जखर्याह आणि मिकलोथ. 38मिकलोथ जो शिमिआमचा पिता होता. या सर्वांनी त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेमेत वस्ती केली.
39नेराला कीश झाला; कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले.
40योनाथानाचा पुत्र:
मरीब-बाल. मरीब-बाल याला मीखाह.
41मीखाहचे पुत्र:
पीथोन, मेलेख, तहरेया व आहाज.
42आहाजास येरह#9:42 इतर मूळ प्रतींनुसार यादाह, यादाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री झाले, जिम्रीस मोसा. 43मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.
44आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे:
अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र होते.
सध्या निवडलेले:
1 इतिहास 9: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.