१ इतिहास 3:1-4
१ इतिहास 3:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाला हेब्रोन येथे पुत्र झाले ते हे : अहीनवाम इज्रेलकरणीपासून अम्नोन हा ज्येष्ठ पुत्र; अबीगईल कर्मेलकरीण हिच्यापासून दानीएल हा दुसरा पुत्र; गश्शूरचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून अबशालोम हा तिसरा; हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा चौथा; अबीटलेपासून शफाट्या हा पाचवा; व दाविदाची बायको एग्ला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा. हे सहा पुत्र त्याला हेब्रोन येथे झाले; तेथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले. यरुशलेमेत त्याने तेहेतीस वर्षे राज्य केले.
१ इतिहास 3:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते. अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ; अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा, गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र, हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा. अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा. दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरूशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
१ इतिहास 3:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती. तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला. पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला. सहावा पुत्र इथ्रियामची पत्नी एग्लाहपासून झाला. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले.