YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 3

3
दावीदाचे पुत्र
1हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र:
दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला.
दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.
2तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला.
चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला.
3पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला.
सहावा पुत्र इथ्रियामची पत्नी एग्लाहपासून झाला.
4हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले.
यरुशलेममध्ये दावीदाने तेहतीस वर्षे राज्य केले. 5यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे:
शम्मुआ#3:5 किंवा शिमिआ, शोबाब, नाथान, शलोमोन हे चार अम्मीएलाची कन्या बथशेबा#3:5 इतर मूळ प्रतींनुसार बथ-शूवा हिच्यापासून झाले.
6नंतर इभार, एलीशुआ,#3:6 इतर मूळ प्रतींनुसार एलीशामा एलिफेलेत. 7नोगा, नेफेग, याफीय, 8एलीशामा, एलयादा व एलिफेलेत हे सुद्धा झाले; असे एकूण नऊ पुत्र होते.
9या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.
यहूदीयाचे राजे
10शलोमोनचा पुत्र रेहोबोअम,
त्याचा पुत्र अबीयाह,
त्याचा पुत्र आसा,
त्याचा पुत्र यहोशाफाट,
11त्याचा पुत्र यहोराम#3:11 यहोराम किंवा योराम,
त्याचा पुत्र अहज्याह,
त्याचा पुत्र योआश,
12त्याचा पुत्र अमस्याह,
त्याचा पुत्र अजर्‍याह,
त्याचा पुत्र योथाम,
13त्याचा पुत्र आहाज,
त्याचा पुत्र हिज्कीयाह,
त्याचा पुत्र मनश्शेह,
14त्याचा पुत्र आमोन,
त्याचा पुत्र योशीयाह.
15योशीयाहचे पुत्र:
ज्येष्ठ योहानान,
दुसरा यहोयाकीम,
तिसरा सिद्कीयाह,
व चौथा शल्लूम.
16यहोयाकीमाचे पुत्र:
यकोन्याह#3:16 किंवा यहोयाखीन,
व सिद्कीयाह.
बंदिवासात गेल्यानंतरचे राजघराणे
17बंदी झालेले यकोन्याहचे पुत्र:
शल्तीएल, 18मल्कीराम, पदायाह, शेनस्सर, यकम्याह, होशामा व नेदब्याह.
19पदायाहचे पुत्र:
जरूब्बाबेल व शिमी.
जरूब्बाबेलाचे पुत्र:
मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ. 20त्या शिवाय आणखी पाच पुत्र होते: हशूबाह, ओहेल, बेरेख्याह, हसद्याह व यूशाब-हेसेद.
21हनन्याहचे पुत्र:
पेलतियाह व यशायाह. यशायाहचा पुत्र रफायाह. रफायाहचा पुत्र नाव अर्णान. अर्णानला ओबद्याह हा झाला. ओबद्याहचा पुत्र शखन्याह.
22शखन्याहचे वंशज:
शमायाह आणि त्याचे पुत्र: हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्याह व शाफाट; एकूण सहा पुत्र.
23निरय्याहचे पुत्र:
एलिओएनाइ, हिज्कीयाह व अज्रीकाम, एकूण तीन पुत्र.
24एलिओएनाइ याचे पुत्र:
होदव्याह, एल्याशीब, पेलतियाह, अक्कूब, योहानान, दलायाह व अनानी; एकूण सात पुत्र.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन