YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 2

2
इस्राएलचे पुत्र
1इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून, 2दान, योसेफ, बिन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
यहूदा
हेस्रोनाचे पुत्र
3यहूदाहचे पुत्र:
एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा#2:3 बथ-शूवा अर्थात् शूआची मुलगी हिच्या पोटी त्यास झाले.
(यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)
4यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले;
यहूदाहास एकंदर पाच पुत्र झाले.
5पेरेसाचे पुत्र:
हेस्रोन व हामूल.
6जेरहाचे पुत्र:
जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा#2:6 काही मूळ प्रतींनुसार दारदा; असे एकंदर पाच पुत्र होते.
7कर्मीचा पुत्र:
आखार#2:7 आखार अर्थात् त्रास यहोशुआमध्ये आखान, ज्याने अविश्वासूपणे मूर्तीस समर्पित वस्तूंची चोरी करून आपल्या इस्राएली राष्ट्रास क्लेश दिला.
8एथानाचा पुत्र:
अजर्‍याह.
9हेस्रोनास झालेले पुत्र:
यरहमेल, राम व केलूबाइ.#2:9 किंवा कालेब
हेस्रोनचा पुत्र राम पासून
10रामास अम्मीनादाब झाला,
आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला.
11नहशोनाला सल्मा#2:11 किंवा सल्मोन
व सल्माला बवाज हा झाला;
12बवाजाला ओबेद झाला
व ओबेदाला इशाय झाला.
13इशायाचे पुत्र:
ज्येष्ठपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब,
तिसरा शिमिआ, 14चवथा नथानेल,
पाचवा रद्दाय, 15सहावा ओसेम,
व सातवा दावीद हे होते.
16त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल.
जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते.
17अबीगईलला अमासा झाला, अमासाचा पिता इश्माएली येथेर होता.
हेस्रोनचा पुत्र कालेब
18हेस्रोनचा पुत्र कालेबास त्याच्या पत्नी अजूबा (व यरियोथ) यांच्यापासून संतती झाली. अजुबाहचे पुत्र:
येशेर, शोबाब व अर्दोन.
19अजुबाहच्या मृत्यूनंतर कालेबाने एफ्राथेशी विवाह केला. तिच्या पोटी त्यास हूर झाला.
20हूरास उरी झाला व उरीस बसालेल झाला.
21नंतर हेस्रोन साठ वर्षांचा असता त्याने गिलआदाचा पिता माखीरच्या कन्येशी विवाह केला व तिच्याशी केलेल्या प्रीतीसंबंधाने त्यास सगूब हा झाला.
22सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले.
23(पण गशूर व अराम यांनी हव्योथ याईर व केनाथ आणि त्यांच्या आसपासची गावे अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली.)
गिलआदाचा पिता माखीरची ही संतती होय.
24हेस्रोन कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी अबीयाहच्या पोटी त्याला तकोवाचा पिता#2:24 पिता किंवा सेनानायक अश्हूर हा झाला.
हेस्रोनाचा ज्येष्ठपुत्र यरहमेल
25हेस्रोनाचा#2:25 किंवा ओरेन ज्येष्ठपुत्र यरहमेल याचे पुत्र:
ज्येष्ठपुत्र राम, बुना, ओरेन ओसेम व अहीयाह. 26यरहमेलाची अटाराह नावाची दुसरी एक पत्नी होती. ती ओनामची आई होती.
27यरहमेलाचा ज्येष्ठपुत्र रामचे पुत्र:
मास, यामीन व एकर.
28ओनामाचे पुत्र:
शम्मय व यादा.
शम्मयाचे पुत्र:
नादाब व अबीशूर. 29अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल होते. तिच्या पोटी त्यास अहबान व मोलीद हे झाले.
30नादाबाचे पुत्र:
सलेद व अप्पईम. सलेद हा पुत्रहीन मेला.
31अप्पईमचा पुत्र:
इशी. इशीला शेशान हा झाला व शेशानाला अहलाय झाला.
32शम्मयाचा भाऊ यादायाचे पुत्र:
येथेर व योनाथान. येथेर हा पुत्रहीन मेला.
33योनाथानचे पुत्र:
पेलेथ व जाजा.
ही यरहमेलाची संतती होती.
34शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या.
त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता. 35शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
36अत्तायास नाथान,
नाथानास जाबाद,
37जाबादास एफलाल,
एफलालास ओबेद,
38ओबेदास येहू,
येहूस अजर्‍याह,
39अजर्‍याहास हेलेस,
हेलेसाला एलीयासाह,
40एलीयासाहला सिस्माय,
सिस्मायास शल्लूम,
41शल्लूमास यकम्याह,
आणि यकम्याहास एलीशामा झाला.
कालेबाचे कूळ
42यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र:
ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता,
मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता.
43हेब्रोनाचे पुत्र:
कोरह, तप्पूआह, रेकेम व शमा.
44शमास रहम झाला.
तो यर्कामाचा पिता होता.
रेकेमास शम्मय हा झाला.
45शम्मयाचा पुत्र मावोन,
माओन हा बेथ-सूराचा पिता होता.
46कालेबाची उपपत्नी एफाहला
हारान, मोसा व गाजेज झाले.
हारानास गाजेज झाला.
47यादायाचे पुत्र:
रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफाह व शाफ.
48कालेबाची उपपत्नी माकाहला
शेबेर व तिर्‍हना हे झाले.
49याशिवाय तिला मदमन्नाहचा पिता शाफ,
आणि मखबेना व गिबियाह यांचा पिता शेवा हे झाले;
कालेबाची कन्या अक्साह होती.
50ही कालेबाची संतती होय.
एफ्राथेचा ज्येष्ठपुत्र हूरचे पुत्र:
शोबाल हा किर्याथ-यआरीमाचा पिता होता. 51सल्मा बेथलेहेमाचा पिता होता. हारेफ हा बेथ-गादेराचा पिता होता.
52किर्याथ-यआरीमाच्या पिता शोबालचे वंशज:
हारोवेह व अर्धे मेनुहोथवासी. 53किर्याथ-यआरीम याची कुळे: इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई. यांच्यापासून सोराथी व एष्टाबुली ही कुळे निघाली.
54सल्माचे वंशज:
बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-योआब आणि अर्धे मानाहथी, सोरी, 55आणि याबेस येथे राहणारी सोफारी#2:55 किंवा लेखनिकांची कुळे: तिराथी, शिमाथी व सुकाथी. रेखाब#2:55 किंवा बेथ-रेकाबचा पिता घराण्याचा मूळ पुरुष हम्मथच्या वंशातील ही केनी कुळे होती.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन