दाविदाला हेब्रोन येथे पुत्र झाले ते हे : अहीनवाम इज्रेलकरणीपासून अम्नोन हा ज्येष्ठ पुत्र; अबीगईल कर्मेलकरीण हिच्यापासून दानीएल हा दुसरा पुत्र; गश्शूरचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून अबशालोम हा तिसरा; हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा चौथा; अबीटलेपासून शफाट्या हा पाचवा; व दाविदाची बायको एग्ला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा. हे सहा पुत्र त्याला हेब्रोन येथे झाले; तेथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले. यरुशलेमेत त्याने तेहेतीस वर्षे राज्य केले.
१ इतिहास 3 वाचा
ऐका १ इतिहास 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 3:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ