१ इतिहास 16:8-22
१ इतिहास 16:8-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा. त्याला त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांवर भरवसा ठेवा; त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा; त्याचा सेवक इस्राएल ह्याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या वंशजांनो, तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत. त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा, हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञापिलेले वचन आठवा; हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाशी शपथ वाहिली, ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली; तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून तुला देईन” त्या वेळी तुम्ही मोजके, फार थोडे होता, व त्या देशात तुम्ही उपरे होता. ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्या लोकांत हिंडले. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही. त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की, “माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”
१ इतिहास 16:8-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा. राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा. त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा. त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो. परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा. निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा. त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा. त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा. त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो, तो परमेश्वर, आमचा देव आहे. त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा. त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा. त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली. याकोबासाठी त्याने तोच नियम केला. आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला. तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुमच्या वतनाचा वाटा असा देईन.” मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता. तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्यात जात होता. पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही. त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली. तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका. माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
१ इतिहास 16:8-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा. त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा. त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो. याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा. परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा. अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, तुम्ही या सर्वांचे स्मरण करा. कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात, ती अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती, हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली, आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला: “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.” त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते. ते एका देशातून दुसर्या देशात, एका राज्यातून दुसर्या राज्यात भटकत असताना, याहवेहने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले: “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”