याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा. त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा. त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो. याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा. परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा. अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, तुम्ही या सर्वांचे स्मरण करा. कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात, ती अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती, हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली, आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला: “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.” त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते. ते एका देशातून दुसर्या देशात, एका राज्यातून दुसर्या राज्यात भटकत असताना, याहवेहने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले: “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
1 इतिहास 16 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इतिहास 16:8-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ