YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 93

93
स्तोत्र 93
1याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत;
याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत;
निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे.
2तुमचे सिंहासन अनादिकालापासून स्थापलेले आहे;
तुम्ही अनंतकाळापासून आहात.
3याहवेह, महासागर उसळत आहेत;
महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे;
समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे.
4सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली,
तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात—
सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.
5हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत;
पवित्रता हे तुमच्या भवनाचे
अनंतकाळचे आभूषण आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 93: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन