याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून, त्यांना सर्व संकटामधून सोडवितात. याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात. नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही, परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात. ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात, त्यातील एकही मोडणार नाही. दुष्टांची दुष्टाई त्यांचा नाश करेल; जे नीतिमानांचे शत्रू आहेत, त्यांना शिक्षा होईल. जे त्यांची सेवा करतात, त्यांचा याहवेह उद्धार करतील; जे त्यांचा आश्रय घेतात ते दंडित होणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 34 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 34:17-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ