YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 34:17-22

स्तोत्रसंहिता 34:17-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल. जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो. नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल. परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही. परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल. परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.

स्तोत्रसंहिता 34:17-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून, त्यांना सर्व संकटामधून सोडवितात. याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात. नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही, परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात. ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात, त्यातील एकही मोडणार नाही. दुष्टांची दुष्टाई त्यांचा नाश करेल; जे नीतिमानांचे शत्रू आहेत, त्यांना शिक्षा होईल. जे त्यांची सेवा करतात, त्यांचा याहवेह उद्धार करतील; जे त्यांचा आश्रय घेतात ते दंडित होणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 34:17-22

स्तोत्रसंहिता 34:17-22 MARVBSIस्तोत्रसंहिता 34:17-22 MARVBSIस्तोत्रसंहिता 34:17-22 MARVBSIस्तोत्रसंहिता 34:17-22 MARVBSIस्तोत्रसंहिता 34:17-22 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा