YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 133

133
स्तोत्र 133
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
1ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते,
जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
2ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान,
त्याच्या दाढीवर ओघळलेल्या,
अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या,
झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.
3हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्‍या
हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे.
कारण हे ते स्थान आहे,
ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 133: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन