YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 132

132
स्तोत्र 132
प्रवाशांचे आराधना गीत.
1हे याहवेह, दावीदाचे
व त्याच्या स्वसुखत्यागाचे स्मरण करा.
2त्याने याहवेहची शपथ घेतली,
याकोबाच्या सर्वसमर्थास असा नवस केला:
3“मी ना माझ्या घरात प्रवेश करेन
अथवा ना अंथरुणात पडेन,
4माझ्या डोळ्यास झोप लागू देणार नाही,
वा डुलकीही घेणार नाही,
5जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही,
याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.”
6याबद्दल आम्ही एफ्राथाहमध्ये ऐकले,
नंतर तो याआर प्रदेशात सापडला:
7“चला आपण त्यांच्या निवासस्थानी जाऊ,
तिथे त्यांच्या चरणी त्यांची उपासना करू.
8‘हे याहवेह, उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह,
तुमच्या विश्रामस्थानी या.
9तुमचे याजक धार्मिकतेची वस्त्रे परिधान करोत;
तुमचे भक्त आनंदघोष करोत.’ ”
10तुमचा सेवक दावीदाकरिता
तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका.
11याहवेहनी दावीदाला शपथ घेऊन म्हटले की,
एक अशी शपथ जी ते कधीही मोडणार नाहीत:
“तुझ्या वंशजांपैकी एकाला
मी तुझ्या राजासनावर विराजमान करेन.
12जर तुझे वंशज मी केलेल्या करारातील अटींचे
व मी शिकविलेल्या आज्ञांचे पालन करतील,
तर त्यांचे वंशजही सदासर्वकाळ
तुझ्या राजासनावर विराजमान होतील.”
13कारण याहवेहनी सीयोनाची निवड केलेली आहे,
आपल्या निवासस्थानासाठी त्यांची ही अभिलाषा आहे, ते म्हणतात,
14“हे माझे कायमचे विश्रांतीचे स्थान आहे;
मी येथे विराजमान होईन, कारण येथेच राहण्याची माझी इच्छा आहे.
15मी या नगरीची भरभराट करेन;
तिच्यातील गरिबांना अन्न देऊन तृप्त करेन.
16तेथील याजकांना तारणाची वस्त्रे नेसवेन,
तेथील भक्त आनंदाने सदैव जयजयकार करतील.
17“येथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल
आणि आपल्या अभिषिक्तासाठी मी एक दीप स्थापित करेन.
18मी त्याच्या शत्रूंना लज्जारूपी पांघरूण घालेन,
परंतु त्याचे मस्तक राजमुकुटाने गौरवमंडित होईल.”

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 132: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन