YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 16:17-33

नीतिसूत्रे 16:17-33 MRCV

सुज्ञांचा मार्ग दुष्टाईला टाळतो; जे त्यांच्या मार्गांचे रक्षण करतात, त्यांचे आयुष्य सुरक्षित राहते. नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे. जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो. सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते, आणि मधुर वचनांनी शिक्षणाला प्रोत्साहन मिळते. सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे; पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते. शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते, आणि त्याचे ओठ ज्ञान प्रसार करते. मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात; ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात. एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो. परिश्रम करणार्‍यांना भूक लागणे योग्य; भूक भागविण्यासाठी त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते. अधम वाईट योजना करतो, आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते. विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते. हिंसा करणारा आपल्या शेजार्‍याला मोहात पाडतो आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो. जो कोणी त्याचे डोळे मिचकावतो तो विकृत योजना करीत असतो; जो कोणी त्याचे ओठ चावतो, तो वाईट प्रवृत्तीचा आहे. पांढरे केस गौरवी मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो. योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, शहर जिंकून घेणार्‍यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम. आपण पदरात नाणेफेक करतो, पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो.

नीतिसूत्रे 16 वाचा