खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो. जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते. नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो. प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते. निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते, परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात. नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात. मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने निष्फळ होतात. नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो. भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्याचा नाश होतो, परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते. जेव्हा नीतिमानांना यश मिळते, तेव्हा नगर आनंदित होते; जेव्हा दुष्टांचा नाश होतो, तेव्हा जयघोषाचा निनाद होतो. नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते, परंतु दुष्टांच्या वक्तव्यांनी नगराचा नाश होतो. विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्याची निंदा करतो; परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो. चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही. मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते, परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो. अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते, परंतु जो जामीनकीच्या हात मिळवणी नकार देतो तो सुरक्षित राहतो.
नीतिसूत्रे 11 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 11:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ