YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 13:28-33

गणना 13:28-33 MRCV

परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले. नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्‍यावर आणि यार्देन नदीच्या खोर्‍यात कनानी लोक राहतात.” तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, “आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो.” परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.” आणि जो देश ते हेरण्यास गेले होते त्याबद्दल त्यांनी इस्राएली लोकांमध्ये वाईट अहवाल पसरविला. ते म्हणाले, “जो देश आम्ही हेरला तो देश त्यांच्या रहिवाशांना खाऊन टाकणारा आहे. जे लोक आम्ही पाहिले ते धिप्पाड आहेत. तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”

गणना 13 वाचा