YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 25

25
बिल्दद
1मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले:
2“प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे;
तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.
3त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय?
आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही?
4मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल?
स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?
5जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही
आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,
6मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे—
मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”

सध्या निवडलेले:

इय्योब 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन