“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती तो छाटून टाकतो आणि फळ न देणार्या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून तो तिची छाटणी करतो. कारण जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही अगोदरच शुद्ध झालाच आहात. म्हणून मजमध्ये राहा, व मी तुम्हामध्ये राहीन. कारण कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही. जो कोणी माझ्यामध्ये राहत नाही, तुम्ही त्या फांदीसारखे आहात, जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून, आगीत टाकून जाळतात. परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल.
योहान 15 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 15:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ