योहान 15:1-7
योहान 15:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल.
योहान 15:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. माझ्यातील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हास सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्यास आपल्याआपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हासही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करीता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्यास फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास मिळेल.
योहान 15:1-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती तो छाटून टाकतो आणि फळ न देणार्या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून तो तिची छाटणी करतो. कारण जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही अगोदरच शुद्ध झालाच आहात. म्हणून मजमध्ये राहा, व मी तुम्हामध्ये राहीन. कारण कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही. जो कोणी माझ्यामध्ये राहत नाही, तुम्ही त्या फांदीसारखे आहात, जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून, आगीत टाकून जाळतात. परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल.
योहान 15:1-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याने अधिक फळ द्यावे म्हणून त्याची छाटणी करतो. मी तुम्हांला जे वचन सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्याशिवाय त्याला स्वतः फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांलाही फळ देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हांला काही करता येणार नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर वेलीपासून छाटलेल्या फाट्याप्रमाणे तो वाळून जातो; असे वाळलेले फाटे एकत्र करून अग्नीत टाकले जातात व तेथे ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिलीत, तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा; ते तुमच्यासाठी केले जाईल.