YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 1:1-11

योहान 1:1-11 MRCV

प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता. तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता. शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही. त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते. तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले नाही. परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले. तो त्या प्रकाशाविषयी प्रमाण पटावे व साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की त्यांच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. तो स्वतः प्रकाश नव्हता; तो केवळ त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला होता. जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता. तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही. ते स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही.