YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 1:1-11

योहान 1:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही. देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.

सामायिक करा
योहान 1 वाचा

योहान 1:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता. तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता. शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही. त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते. तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले नाही. परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले. तो त्या प्रकाशाविषयी प्रमाण पटावे व साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की त्यांच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. तो स्वतः प्रकाश नव्हता; तो केवळ त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला होता. जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता. तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही. ते स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही.

सामायिक करा
योहान 1 वाचा

योहान 1:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्वकाही त्याच्या द्वारे झाले1 आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. तो साक्षीकरता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला; ह्यासाठी की, त्याच्या द्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे2 त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.

सामायिक करा
योहान 1 वाचा

योहान 1:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीही झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो व अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने एक मनुष्य पाठवला. त्याचे नाव योहान असे होते. तो साक्षीकरता, म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. तो स्वतः प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला होता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो स्वकीयांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.

सामायिक करा
योहान 1 वाचा

योहान 1:1-11

योहान 1:1-11 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा