YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हबक्कूक 3:13-19

हबक्कूक 3:13-19 MRCV

तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व अभिषिक्तांना वाचविण्यासाठी बाहेर पडलात. तुम्ही दुष्ट भूमीच्या पुढाऱ्यांचा चुराडा केला आणि त्यांना डोक्यापासून पायांपर्यंत विवस्त्र केले. सेला आमची दाणादाण करण्यासाठी त्यांचे योद्धे धावून आले, तेव्हा त्याने स्वतःच्याच भाल्याने आपले मस्तक छेदून घेतले, लपलेल्या दुष्टास जणू तो गिळंकृत करेल अशा हावरटपणाने तो आला. तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले, की महाजलाशय घुसळले. मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली, भीतीने माझे ओठ कापू लागले; माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला, आणि माझे पाय थरथरू लागले. तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन. अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत, तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन. सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत; मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील.

हबक्कूक 3 वाचा