“परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे. त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही. म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे. “हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन. “या शब्दांचा अर्थ हा असा: “ मने : परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे. “ तकेल : तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात. “ फारसीन : आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.” नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले. त्याच रात्री खाल्डियन लोकांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला; आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला.
दानीएल 5 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 5:22-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ