YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 3

3
शलोमोन मंदिर बांधतो
1मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती. 2शलोमोन राजाने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बांधकामास सुरुवात केली.
3परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाने पाया घातला, त्याची लांबी साठ हात आणि रुंदी वीस हात#3:3 अंदाजे 27 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद होती. 4मंदिरापुढील द्वारमंडपाची लांबी मंदिराच्या रुंदीएवढीच म्हणजेच वीस हात व उंचीही वीस हात होती.
त्याच्या आतील भाग शुद्ध सोन्याने मढविलेला होता. 5मंदिराचा दिवाणखाना त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी करून ती सोन्याने मढविली व तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्यांची नक्षीचे कोरीव काम केले होते. 6मंदिर मोलवान रत्नांनी सजविले होते. परवाईम नामक ठिकाणी मिळणारे सोने वापरण्यात आले होते. 7त्याने मंदिराच्या छताचे वासे, दारांच्या चौकटी, भिंती आणि मंदिराचे दरवाजे सोन्याने मढविले, भिंतींवर करुबाची आकृती कोरली.
8त्याने परमपवित्रस्थान बांधले, त्याची लांबी मंदिराच्या रुंदीएवढी, वीस हात लांब आणि वीस हात रुंद होती. त्याच्या आतील भाग सहाशे तालांत#3:8 अंदाजे 21 मेट्रिक टन शुद्ध सोन्याने मढविला. 9त्यात पन्नास शेकेल#3:9 अंदाजे 575 ग्रॅ. वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता.
10मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात शलोमोनाने दोन कोरलेले करूब बसविले व त्यांनाही सोन्याने मढविले. 11करुबांच्या पंखांची एकूण लांबी वीस हात होती. पहिल्या करुबाचा एक पंख पाच हात लांब होता आणि तो मंदिराच्या भिंतीला लागून होता, तर त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात#3:11 अंदाजे 2.3 मीटर लांब असून दुसऱ्या करुबाच्या पंखाला लागून होता. 12त्याचप्रमाणे दुसऱ्या करुबांचा एक पंख पाच हात लांब आणि मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागून होता आणि त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब आणि पहिल्या करुबाच्या पंखाला लागून होता. 13या करुबांचे पंख वीस हात पसरलेले होते. मुख्य दिवानखाण्याकडे#3:13 किंवा आतील बाजूस तोंड करून ते त्यांच्या पायांवर उभे होते.
14त्याने करुबांच्या आकाराची कशिदा केलेले निळ्या, जांभळ्या व किरमिजी धाग्यांचे आणि तागाच्या कापडाचे पडदे तयार केले.
15मंदिराच्या समोरील भागासाठी त्याने दोन आधारस्तंभ तयार केले जे एकत्र मिळून पस्तीस हात#3:15 अंदाजे 16 मीटर लांब होते, प्रत्येक स्तंभावर पाच हात उंचीचा कळस होता. 16त्याने एकमेकात गुंफून विणलेल्या साखळ्या बनविल्या आणि त्या आधारस्तंभाच्या टोकांवर ठेवल्या. त्याने शंभर डाळिंबेसुद्धा तयार केली आणि त्यांना साखळ्यांना लागून जोडले. 17त्याने मंदिराच्या समोर आधारस्तंभ बांधले, एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे असे ते उभारले. दक्षिणेकडील खांबाला त्याने याखीन#3:17 याखीन अंदाजे अर्थ तो स्थापित करतो असे नाव दिले आणि उत्तरेकडील खांबाला बवाज#3:17 बवाज अंदाजे अर्थ त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे असे नाव दिले.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन