कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने एक दान म्हणून सर्व लोक ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे देवाबरोबर नीतिमान ठरले आहेत. त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे. तर मग फुशारकीचे काय? तिला तर मुळीच वाव नाही. कोणत्या नियमाने? कृत्यांनी काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने.
रोमकरांना 3 वाचा
ऐका रोमकरांना 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांना 3:23-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ