येशू प्रेषितांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला. त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती उभा होता. तसेच सर्व यहुदिया व यरुशलेम येथून आलेल्या आणि सोर व सिदोन येथील किनारपट्टीवरील लोकांचा विशाल समुदायसुद्धा तेथे उभा होता. हे लोक त्याचा संदेश ऐकायला व रोग बरे करून घ्यायला आले होते. अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना त्याने बरे केले. सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना रोगमुक्त करत होते. नंतर येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीन जनहो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो भुकेलेले जनहो, तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील. तुम्हांला वाळीत टाकतील. तुमची निंदा करतील आणि तुमच्या नावाला काळिमा फासतील. तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा कारण पाहा, स्वर्गात तुमचे पारितोषिक मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत. परंतु तुम्हां धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला सुखसोयी मिळाल्या आहेत. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांविषयी असेच बोलत असत.
लूक 6 वाचा
ऐका लूक 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 6:17-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ