YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 6:17-26

लूक 6:17-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला, आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय, आणि सर्व यहूदीया व यरुशलेम येथून व सोर व सीदोन ह्यांकडल्या समुद्रकिनार्‍यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता; तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो, जे तुम्ही आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत. परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.

सामायिक करा
लूक 6 वाचा

लूक 6:17-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तो त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला व यहूदीया प्रांत, यरूशलेम शहर, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते. ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले. सगळा लोकसमुदाय त्यास स्पर्श करू पाहत होता, कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते. मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, “अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो जे तुम्ही आता भूकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल. जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. त्यादिवशी आनंद करून उड्या मारा, कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुद्धा तसेच केले. पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे. जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हास दुःख होवो, कारण तुम्ही भूकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल. जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हास दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.”

सामायिक करा
लूक 6 वाचा

लूक 6:17-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ते खाली आले आणि एका सपाट मैदानावर उभे राहिले. त्यांच्याभोवती शिष्यांचा मोठा समुदाय आणि यरुशलेम, यहूदीया आणि सोर व सीदोन व उत्तरेकडील समुद्रकिनार्‍यांच्या नगरातूनही आलेले अनेक लोक होते. ते येशूंचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी आले होते. जे अशुद्ध आत्म्याने पीडलेले होते, त्यांनाही त्यांनी बरे केले. प्रत्येकजण त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होता, कारण त्यांच्यामधून सामर्थ्य बाहेर निघून ते बरे होत. नंतर आपल्या शिष्यांना पाहून म्हणाले: “जे दीन आहेत ते तुम्ही धन्य, कारण परमेश्वराचे राज्य तुमचे आहे. जे आता भुकेले आहेत ते तुम्ही धन्य, कारण ते तृप्त होतील. जे आता विलाप करीत आहात ते तुम्ही धन्य कारण तुम्ही हसाल. मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात, दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात, तेव्हा तुम्ही धन्य. “त्या दिवशी आनंदाने उड्या मारा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांच्या पूर्वजांनीही संदेष्ट्यांना असेच वागविले होते. “तुम्हा श्रीमंतास धिक्कार असो, कारण तुम्हाला तुमचे सांत्वन आधीच मिळाले आहे. जे तुम्ही आता तृप्त आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही उपाशी राहाल. आता जे तुम्ही हसत आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही विलाप कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हाविषयी चांगले बोलतात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण आपले पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच वागवित असत.

सामायिक करा
लूक 6 वाचा

लूक 6:17-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला, आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय, आणि सर्व यहूदीया व यरुशलेम येथून व सोर व सीदोन ह्यांकडल्या समुद्रकिनार्‍यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता; तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो, जे तुम्ही आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत. परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.

सामायिक करा
लूक 6 वाचा

लूक 6:17-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू प्रेषितांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला. त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती उभा होता. तसेच सर्व यहुदिया व यरुशलेम येथून आलेल्या आणि सोर व सिदोन येथील किनारपट्टीवरील लोकांचा विशाल समुदायसुद्धा तेथे उभा होता. हे लोक त्याचा संदेश ऐकायला व रोग बरे करून घ्यायला आले होते. अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना त्याने बरे केले. सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना रोगमुक्त करत होते. नंतर येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीन जनहो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो भुकेलेले जनहो, तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील. तुम्हांला वाळीत टाकतील. तुमची निंदा करतील आणि तुमच्या नावाला काळिमा फासतील. तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा कारण पाहा, स्वर्गात तुमचे पारितोषिक मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत. परंतु तुम्हां धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला सुखसोयी मिळाल्या आहेत. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांविषयी असेच बोलत असत.

सामायिक करा
लूक 6 वाचा