YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 3:16-22

लूक 3:16-22 MACLBSI

योहान त्या सर्वांना उत्तर देत असे, “मी तर तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडायलाही मी पात्र नाही, तो येत आहे. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देइल. आपले खळे अगदी स्वच्छ करायला व गहू आपल्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे. मात्र भूस तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.” तसेच इतर अनेक प्रकारे लोकांना आवाहन करीत तो शुभवर्तमानाची घोषणा करीत असे. मात्र त्याने राज्यकर्ता हेरोद ह्याला त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे हेरोदने ह्या सर्वांहून अधिक मोठे दुष्कर्म केले; ते म्हणजे त्याने योहानला तुरुंगात कोंडून ठेवले. तेथील सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यावर येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा दृश्य रूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”

लूक 3 वाचा

ऐका लूक 3

संबंधित व्हिडिओ