YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 3:16-22

लूक 3:16-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.” योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली. योहानाने चौथाईचा शासक हेरोद याची कानउघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नी हेरोदीया हिच्याशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या. हे सर्व करून सुद्धा त्याने आणखी एक दुष्कर्म केले ते म्हणजे त्याने योहानाला तुरुंगात टाकले. तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”

सामायिक करा
लूक 3 वाचा

लूक 3:16-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु जे माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत ते येतील, त्यांचा गुलाम होऊन त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडण्याचीही माझी योग्यता नाही. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.” दुसर्‍या अनेक शब्दांनी योहानाने लोकांना बोध केला आणि जाहीरपणे शुभवार्ता सांगितली. योहानाने मांडलिक हेरोदाला दोष दिला, कारण त्याने आपल्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याशी िववाह केला आणि इतर अनेक वाईट गोष्टी केल्या, या सर्वांमध्ये हेरोदाने आणखी भर घातली: त्याने योहानाला तुरुंगात टाकले. जेव्हा सर्व लोक बाप्तिस्मा घेत होते त्यावेळी येशूंचाही बाप्तिस्मा झाला आणि येशू प्रार्थना करीत असताना स्वर्ग उघडला, आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा शारीरिक रूपामध्ये त्यांच्यावर स्थिरावला आणि स्वर्गातून एक वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”

सामायिक करा
लूक 3 वाचा

लूक 3:16-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, “मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडण्यास मी योग्य नाही, तो येत आहे; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठवण्यास त्याचे सूप त्याच्या हातात आहे; पण भूस तो न विझणार्‍या अग्नीत जाळून टाकील.” आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांना सुवार्तेची घोषणा करत असे. पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे, त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की, योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की, आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

सामायिक करा
लूक 3 वाचा

लूक 3:16-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

योहान त्या सर्वांना उत्तर देत असे, “मी तर तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडायलाही मी पात्र नाही, तो येत आहे. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देइल. आपले खळे अगदी स्वच्छ करायला व गहू आपल्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे. मात्र भूस तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.” तसेच इतर अनेक प्रकारे लोकांना आवाहन करीत तो शुभवर्तमानाची घोषणा करीत असे. मात्र त्याने राज्यकर्ता हेरोद ह्याला त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे हेरोदने ह्या सर्वांहून अधिक मोठे दुष्कर्म केले; ते म्हणजे त्याने योहानला तुरुंगात कोंडून ठेवले. तेथील सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यावर येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा दृश्य रूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”

सामायिक करा
लूक 3 वाचा