YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 138

138
परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र
1मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन;
मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
2मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन,
तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन.
तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची #कराराचीथोरवी वाढविली आहेस.
3मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस.
तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
4हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील,
कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
5खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील
कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
6कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो,
पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
7जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस.
माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस;
आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
8परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे;
हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे.
तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 138: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन