पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून : ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला, व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. त्याच्या द्वारे आम्हांला कृपा व प्रेषितपद मिळाले; अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात; त्या तुम्हांला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो. पहिल्याप्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो; कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा; ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुमच्याविषयी व तुम्हांला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. हेल्लेणी व बर्बर,1 ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे. ह्याप्रमाणे रोम शहरात राहणार्या तुम्हांलाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे.
रोमकरांस पत्र 1 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 1:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ