रोमकरांस पत्र 1:1-17
रोमकरांस पत्र 1:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला ज्या शुभवार्तेविषयी पवित्रशास्त्रलेखात त्यांनी आपल्या संदेष्ट्यांद्वारे आधी अभिवचन दिले होते. त्यांच्या पुत्राविषयी, जे शारीरिक दृष्टीने दावीदाचे वंशज होते, ते आपले प्रभू येशू ख्रिस्त, जे पवित्रतेच्या आत्म्याद्वारे व मृतांच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने परमेश्वराचे पुत्र ठरविले गेले. त्यांच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण मिळाले आहे; ते यासाठी की सर्व गैरयहूदीयांनी त्यांच्या नावाकरिता विश्वासाने आज्ञापालन करणारे व्हावे. तुम्ही सुद्धा त्या गैरयहूदीयांमधून येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलाविलेले आहात. रोम मधील सर्वजण, ज्यांच्यावर परमेश्वर प्रीती करतात आणि ज्यांना त्यांचे पवित्र लोक होण्यासाठी पाचारण केले आहे: परमेश्वर जे आपले पिता व येशू ख्रिस्त आपले प्रभू यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. ज्या परमेश्वराची सेवा मी माझ्या आत्म्याने व त्याच्या पुत्राच्या शुभवार्तेचा संदेश गाजवून करतो, ते माझे साक्षी आहेत की, मी नेहमीच तुमची आठवण करीत असतो. माझ्या प्रार्थनेमध्ये मी सर्वदा प्रार्थना करतो की शेवटी का होईना परमेश्वराची इच्छा असेल तर तुमच्याकडे येण्याचा माझा मार्ग मोकळा व्हावा. तुम्ही बळकट व्हावे म्हणून तुम्हाला आध्यात्मिक देणगी प्रदान करावी यासाठी भेटण्यास मी उत्कंठित झालो आहे— तर एकमेकांच्या विश्वासाकडून मला व तुम्हालाही उत्तेजन मिळावे. बंधूंनो व भगिनींनो, इतर गैरयहूदीयांमध्ये मला जशी पीकप्राप्ती झाली, तशी तुम्हामध्येही व्हावी म्हणून मी तुमच्याकडे येण्याचा अनेकदा निश्चय केला, पण आतापर्यंत मला प्रतिबंध करण्यात आला, हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. कारण ग्रीक व बर्बर, तसेच शहाणे व मूर्ख या दोघांचाही मी ॠणी आहे. यामुळे तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हालाही शुभवार्ता सांगण्यास मी एवढा उत्सुक झालो आहे. शुभवार्तेची मला लाज वाटत नाही, कारण त्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाचे, प्रथम यहूदीयांचे नंतर गैरयहूदीयांचे तारण करण्यास ती परमेश्वराचे सामर्थ्य आहे. या शुभवार्तेमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व प्रकट होते व हे नीतिमत्व विश्वासाने प्रथमपासून शेवटपर्यंत विश्वासाद्वारे साध्य होते, कारण असे लिहिले आहे, “नीतिमान विश्वासाने जगेल.”
रोमकरांस पत्र 1:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून; देवाने सुवार्तेविषयी आपल्या संदेष्ट्यांद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते; ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला. व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे. त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली आहेत, ह्यासाठी की सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जावे. त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहात. रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्रजन होण्यास बोलावलेल्यांस देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती मिळत राहो. मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्तेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की, मी निरंतर माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो; आणि अशी विनवणी करतो की, आता शेवटी शक्यतो देवाच्या इच्छेने तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे; म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे. बंधूंनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा देणेकरी आहे. म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही. कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते कारण असा शास्त्रलेख आहे की, “नीतिमान विश्वासाने जगेल.”
रोमकरांस पत्र 1:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला ज्या शुभवार्तेविषयी पवित्रशास्त्रलेखात त्यांनी आपल्या संदेष्ट्यांद्वारे आधी अभिवचन दिले होते. त्यांच्या पुत्राविषयी, जे शारीरिक दृष्टीने दावीदाचे वंशज होते, ते आपले प्रभू येशू ख्रिस्त, जे पवित्रतेच्या आत्म्याद्वारे व मृतांच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने परमेश्वराचे पुत्र ठरविले गेले. त्यांच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण मिळाले आहे; ते यासाठी की सर्व गैरयहूदीयांनी त्यांच्या नावाकरिता विश्वासाने आज्ञापालन करणारे व्हावे. तुम्ही सुद्धा त्या गैरयहूदीयांमधून येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलाविलेले आहात. रोम मधील सर्वजण, ज्यांच्यावर परमेश्वर प्रीती करतात आणि ज्यांना त्यांचे पवित्र लोक होण्यासाठी पाचारण केले आहे: परमेश्वर जे आपले पिता व येशू ख्रिस्त आपले प्रभू यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. ज्या परमेश्वराची सेवा मी माझ्या आत्म्याने व त्याच्या पुत्राच्या शुभवार्तेचा संदेश गाजवून करतो, ते माझे साक्षी आहेत की, मी नेहमीच तुमची आठवण करीत असतो. माझ्या प्रार्थनेमध्ये मी सर्वदा प्रार्थना करतो की शेवटी का होईना परमेश्वराची इच्छा असेल तर तुमच्याकडे येण्याचा माझा मार्ग मोकळा व्हावा. तुम्ही बळकट व्हावे म्हणून तुम्हाला आध्यात्मिक देणगी प्रदान करावी यासाठी भेटण्यास मी उत्कंठित झालो आहे— तर एकमेकांच्या विश्वासाकडून मला व तुम्हालाही उत्तेजन मिळावे. बंधूंनो व भगिनींनो, इतर गैरयहूदीयांमध्ये मला जशी पीकप्राप्ती झाली, तशी तुम्हामध्येही व्हावी म्हणून मी तुमच्याकडे येण्याचा अनेकदा निश्चय केला, पण आतापर्यंत मला प्रतिबंध करण्यात आला, हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. कारण ग्रीक व बर्बर, तसेच शहाणे व मूर्ख या दोघांचाही मी ॠणी आहे. यामुळे तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हालाही शुभवार्ता सांगण्यास मी एवढा उत्सुक झालो आहे. शुभवार्तेची मला लाज वाटत नाही, कारण त्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाचे, प्रथम यहूदीयांचे नंतर गैरयहूदीयांचे तारण करण्यास ती परमेश्वराचे सामर्थ्य आहे. या शुभवार्तेमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व प्रकट होते व हे नीतिमत्व विश्वासाने प्रथमपासून शेवटपर्यंत विश्वासाद्वारे साध्य होते, कारण असे लिहिले आहे, “नीतिमान विश्वासाने जगेल.”
रोमकरांस पत्र 1:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून : ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला, व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. त्याच्या द्वारे आम्हांला कृपा व प्रेषितपद मिळाले; अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात; त्या तुम्हांला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो. पहिल्याप्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो; कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा; ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुमच्याविषयी व तुम्हांला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. हेल्लेणी व बर्बर,1 ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे. ह्याप्रमाणे रोम शहरात राहणार्या तुम्हांलाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे.
रोमकरांस पत्र 1:1-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून: हे शुभवर्तमान देवाचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त, ह्याच्याविषयी आहे. ह्या शुभवर्तमानाविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांद्वारे पूर्वीच अभिवचन दिले होते. येशू देहाने दावीदच्या वंशात जन्मला व दिव्य पावित्र्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा घोषित करण्यात आला. त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. ह्या लोकांमध्ये तुमच्या रोममधील श्रद्धावंतांचाही समावेश होतो कारण तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात. म्हणून रोममधील तुम्हां श्रद्धावंतांना मी लिहीत आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने त्याची प्रजा होण्यासाठी तुम्हांला आमंत्रित केले आहे. त्या तुम्हांला देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती मिळो. पहिल्या प्रथम तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी माझ्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. मी जे काही सांगत आहे ते खरे आहे, ह्याविषयी देव माझा साक्षीदार आहे. त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान घोषित करून मी देवाची मनापासून सेवा करीत आहे. देवाला माहीत आहे की, तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी माझ्या प्रार्थनेमध्ये सर्वदा अशी विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे मी, तुमच्या व माझ्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांना, मला तुमच्यांकडून व तुम्हांला माझ्याकडून उत्तेजन प्राप्त व्हावे. बंधुजनहो, इतर यहुदीतरांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली, तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आत्तापर्यंत मला अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. सुसंस्कृत आणि असंस्कृत, तसेच सुज्ञ व मूढ अशा सर्व लोकांचा मी ऋणी आहे. म्हणून रोम शहरात राहणाऱ्या तुम्हांलाही शुभवर्तमान सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. मला शुभवर्तमानाची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी, म्हणजेच प्रथम यहुदी व नंतर यहुदीतर माणसांसाठीदेखील, ते देवाचे तारणदायक सामर्थ्य आहे. त्यात परमेश्वर स्वतःबरोबरचे माणसाचे संबंध कसे यथोचित करतो, ते दाखविले आहे. ते सुरुवातीपासून श्रद्धेने होत असते. धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’