YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 96

96
उपकारस्तुतीचे गीत
(१ इति. 16:23-33)
1परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
2परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा.
3राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
4कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.
5कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती1 आहेत; परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.
6मान व महिमा त्याच्यासमोर आहेत; सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत;
7अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा; परमेश्वराचा गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.
8परमेश्वराच्या नावाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या;
9पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा; हे सर्व पृथ्वी त्याच्यापुढे कंपायमान हो.
10राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.”
11आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो, समुद्र व त्यातील सर्वकाही गर्जना करोत;
12शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत; मग वनांतील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील;
13कारण तो आला आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 96: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन