YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 95

95
उपकारस्मरणाचे गीत
1याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू.
2उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
3कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे.
4त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत; पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
5समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला; कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली.
6याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू.
7कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!
8मरीबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका;
9तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पारखले;
10चाळीस वर्षे त्या पिढीचा मला वीट आला; मी म्हणालो, “हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत; ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत;”
11म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 95: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन