अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन; प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन. ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही; तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू. त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापले, त्याने इस्राएलासाठी नियमशास्त्र केले. त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की, त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे, आणि पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणार्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या; त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे. त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात; आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.
स्तोत्रसंहिता 78 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 78
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 78:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ