YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 70

70
मुक्ततेसाठी प्रार्थना
(स्तोत्र. 40:13-17)
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्मरणार्थ स्तोत्र.
1हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर.
2जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.
3मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्‍यांची फजिती होऊन ते लज्जेने मागे हटोत.
4तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “देवाचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत.
5मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर; माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे परमेश्वरा, विलंब लावू नकोस.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 70: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन