स्तोत्रसंहिता 64
64
गुप्त शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक; वैर्याच्या भयापासून माझ्या जिवाचे रक्षण कर.
2दुष्टांच्या कटापासून, दुष्कर्म्यांच्या गुप्त मसलतीपासून मला लपव.
3त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्त्विकाला एकान्तात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरला आहे.
4ते त्याच्यावर अकस्मात मारा करतात; ते भीत नाहीत.
5ते आपला दुष्ट संकल्प दृढ करतात; पाश गुप्तपणे मांडण्याविषयी ते कुजबुज करतात; “आम्हांला कोण पाहणार?” असे ते म्हणतात.
6ते कुटिल युक्त्या शोधून काढतात; ते म्हणतात, “आपण चतुराईने युक्ती शोधून काढली आहे;” प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे,
7तरी देव त्यांच्यावर तीर सोडील; ते अकस्मात घायाळ होतील.
8त्यांचीच जीभ त्यांना प्रतिकूल होऊन ते अडखळून पडतील; त्यांना पाहणारे सर्व जण डोके हलवतील.
9तेव्हा मानवजातीस धाक बसेल; ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील.
10परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील; सरळ अंतःकरणाचे सर्व जन उल्लास पावतील.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 64: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.