YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 52

52
ज्ञानशून्य दुष्टांचा फोलपणा
मुख्य गवयासाठी; दाविदाचे मस्कील (बोधपर स्तोत्र); दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे असे दवेग अदोमी ह्याने शौलाकडे येऊन कळवले तेव्हाचे.
1हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे.
2अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.
3तुला बर्‍यापेक्षा वाइटाची, सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे.
(सेला)
4अगे कपटी जिभे, तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात;
5परंतु देव तुझा नाश करील; तो तुला धरून डेर्‍यातून खेचून काढील, व जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.
(सेला)
6नीतिमान हे पाहून भितील, व त्याला हसून म्हणतील,
7“पाहा, हाच तो पुरुष, ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरवसा ठेवला आणि हा दुष्कर्माने माजला.”
8मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.
9हे तू घडवून आणले आहे म्हणून मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन; तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 52: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन