स्तोत्रसंहिता 47
47
देव अखिल पृथ्वीचा राजा
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे स्तोत्र.
1अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा; उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा.
2कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे; तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.
3तो लोकांना आमच्या ताब्यात देतो; तो राष्ट्रांना आमच्या पायांखाली घालतो.
4त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे.
(सेला)
5जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.
6देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा; आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.
7कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
8देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे.
9राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत; अब्राहामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत; तो परमथोर आहे.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 47: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.