YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 2

2
परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य
1राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत?
2परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की,
3“चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.”
4स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे.
5पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील.
6तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”
7मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे;
8माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन;
9लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”
10राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या.
11भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.1
12पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 2: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन