YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 1

1
भाग पहिला
नीतिमान व अनीतिमान
1जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही,
2तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.
3जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.
4दुर्जन तसे नाहीत, ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुसासारखे आहेत.
5ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाहीत; पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत;
6कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन