YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 112:1-9

स्तोत्रसंहिता 112:1-9 MARVBSI

परमेशाचे स्तवन करा!1 जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल; सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया व न्याय ही आहेत. जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते; तो न्यायाने आपले व्यवसाय करील. तो कधीही ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2