YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 112

112
परमेश्वराचे भय धरणार्‍याची भरभराट
1परमेशाचे स्तवन करा!1 जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य!
2त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल; सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.
3धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते.
4सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया व न्याय ही आहेत.
5जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते; तो न्यायाने आपले व्यवसाय करील.
6तो कधीही ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.
7तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते.
8त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.
9त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2
10हे पाहून दुर्जन खिन्न होईल; तो दातओठ खाईल पण विरघळून जाईल; दुर्जनांची इच्छा नष्ट होईल.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 112: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन