आमचे शत्रू म्हणाले, “आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यांना मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळायचे नाही की दिसायचे नाही.” मग जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे दहादा येऊन म्हणाले की, “तुम्ही आमच्याकडे परत या.” ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.” देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो. त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करत आणि यहूदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत. कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करत व दुसर्या हातात शस्त्रे धारण करत. बांधकाम करणारे आपल्या कंबरेस तलवार लावून काम करत. रणशिंग वाजवणारा माझ्याजवळ असे.
नहेम्या 4 वाचा
ऐका नहेम्या 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नहेम्या 4:11-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ