शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व येशूवा ह्यांच्याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे : सराया, यिर्मया, एज्रा, अमर्या, मल्लूख, हट्टूश,
शखन्या, रहूम, मरेमोथ, इद्दो, गिन्नथोई, अबीया, मियामीन, माद्या, बिल्गा, शमया, योयारीब, यदया, सल्लू, आमोक, हिल्कीया व यदया; हे येशूवाच्या काळात याजकांतले व त्यांच्या बांधवांतले मुख्य होते.
लेवी : येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते;
आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्यांच्याबरोबर पहार्यावर होते.
येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमाला एल्याशीब झाला, एल्याशीबाला योयादा झाला,
योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला.
योयाकीमाच्या दिवसांत याजक पितृकुळातले मुख्य होते, ते हे : सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या,
एज्रापासून मशुल्लाम, अमर्यापासून यहोहानान,
मल्लूखीपासून योनाथान, शबन्यापासून योसेफ,
हारीमापासून अदना, मरायोथापासून हेलकइ,
इद्दोपासून जखर्या, गिन्नथोनापासून मशुल्लाम,
अबीयापासून जिख्री, मिन्यामिनापासून, मोवद्या-पासून पिल्तय,
बिल्गापासून शम्मूवा, शमयापासून यहोनाथान,
योयारीबापासून मत्तनई, यदयापासून उज्जी,
सल्लाइपासून कल्लय, आमोकापासून एबेर,
हिज्कीयापासून हशब्या व यदायापासून नथनेल.
एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दूवा ह्यांच्या काळात लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळाचे मुख्य होते.
लेव्यांचे वंशज, आपापल्या पितृकुळांचे मुख्य, इतिहासाच्या पुस्तकात, एल्याशिबाचा पुत्र योहानान ह्याच्या काळापर्यंत नमूद केले होते;
आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते.
मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशींवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत;
हे योयाकीम बिन येशूवा बिन योसादाक ह्याच्या दिवसांत व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एज्रा याजक ह्यांच्या दिवसांत होते.