त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली. ह्या सर्व गोष्टींविषयी योहानाला त्याच्या शिष्यांनी सांगितले. मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?” ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाने आम्हांला आपल्याकडे असे विचारण्यास पाठवले आहे की, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?” त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकांना रोग, पीडा व वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बर्याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती. मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’ जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
लूक 7 वाचा
ऐका लूक 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 7:17-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ