YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 7:17-23

लूक 7:17-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीया प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली. योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्वकाही सांगितले, नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठवले की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हास तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील दुष्ट आत्मे काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य आहे.”

सामायिक करा
लूक 7 वाचा

लूक 7:17-23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंची ही बातमी यहूदीया प्रांताच्या कानाकोपर्‍यातून आणि सरहद्दीच्या पलीकडेही पसरली. योहानालाही या सर्व गोष्टींविषयी त्याच्या शिष्यांनी सांगितले. त्याने दोघांना बोलावले, आणि त्यांना प्रभुकडे विचारण्यास पाठविले: “जे यावयाचे ते आपण आहात किंवा आम्ही इतराची वाट पाहावी?” ते लोक येशूंकडे आल्यानंतर त्यांना म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहानाने आम्हास आपणाकडे असे विचारावयास पाठविले आहे की, जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” त्याच घटकेस, येशूंनी पुष्कळ लोकांस रोग, पीडा व दुरात्मे यापासून मुक्त केले आणि पुष्कळ आंधळ्यांना दृष्टी दिली. तेव्हा जे निरोप घेऊन आले होते त्यांना म्हणाले, “तुम्ही जे पाहिले आणि ऐकले ते योहानाला सांगा: आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते. जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”

सामायिक करा
लूक 7 वाचा

लूक 7:17-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली. ह्या सर्व गोष्टींविषयी योहानाला त्याच्या शिष्यांनी सांगितले. मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाने आम्हांला आपल्याकडे असे विचारण्यास पाठवले आहे की, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकांना रोग, पीडा व वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बर्‍याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती. मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’ जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”

सामायिक करा
लूक 7 वाचा

लूक 7:17-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात व भोवतालच्या सर्व प्रदेशांत पसरली. ह्या सर्व गोष्टी त्याच्या शिष्यांनी योहानला सांगितल्या. योहानने त्याच्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले, “जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” त्यांनी त्याच्याकडे येऊन विचारले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने आम्हांला आपल्याकडे असे विचारायला पाठवले आहे की, जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” त्याच घटकेस त्याने रोग, पीडा व दुष्ट आत्मे ह्यांपासून अनेकांना मुक्‍त केले आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टी दिली. त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा. आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मृत उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते. जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य होय.”

सामायिक करा
लूक 7 वाचा