YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 37

37
1हे ऐकून माझे हृदय थरथरून स्थानभ्रष्ट होते.
2ऐका हो ऐका! त्याच्या वाणीची गर्जना ऐका, त्याच्या मुखातून निघणारा ध्वनी ऐका.
3तो त्याला नभोमंडळाखाली सर्वत्र धाडतो, विद्युल्लतेसह पृथ्वीच्या दिगंतरी त्याला पाठवतो.
4तिच्यामागून गर्जनेचा ध्वनी होतो; तो आपल्या प्रतापी ध्वनीने गर्जतो; त्याचा शब्द ऐकू येतो तेव्हा तो विद्युल्लतेचे चमकणे थांबवत नाही.
5देव अदुभुत शब्दाने गर्जतो; आम्हांला अगम्य अशी मोठी कृत्ये तो करतो.
6तो हिमाला म्हणतो, ‘पृथ्वीवर पड;’ पावसाच्या सरीला व भारी पर्जन्यवृष्टीला तो असेच म्हणतो.
7त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी त्याला ओळखावे, म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करतो.
8तेव्हा वनपशू आडोसा शोधतात व आपल्या गुहांत पडून राहतात.
9वावटळ दक्षिणेकडून येते. उत्तरेकडील वार्‍यांमुळे थंडी येते.
10देवाच्या श्वासाच्या फुंकराने हिम होते, तेव्हा विस्तीर्ण जलाशय गोठून जातात.
11तो मेघ जलपूर्ण करतो; तो आपल्या विद्युल्लतेचे अभ्र चोहोकडे पसरतो;
12ते त्याच्या सूत्राने चोहोकडे फिरतात; म्हणजे अर्थात त्यांना आज्ञापिलेले कार्य ते अखिल भूपृष्ठावर करतात;
13शिक्षेसाठी असो, त्याच्या ह्या पृथ्वीच्या हितासाठी असो, किंवा दया करण्यासाठी असो, तो त्यांना पाठवतो.
14ईयोबा, कान देऊन हे ऐक; स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर.
15देव मेघांना आज्ञा देऊन त्यांचा प्रकाश चमकायला कसा लावतो, हे तुला कळते काय?
16मेघ कसे समतोल राहतात हे तुला कळते काय? त्या सर्वज्ञाच्या अद्भुत कृत्यांचे मर्म तू जाणतोस काय?
17दक्षिणेकडील वार्‍याने पृथ्वी निर्वात होते तेव्हा तुझी वस्त्रे कशी तापतात?
18ओतीव आरशासारखे भक्कम नभोमंडळ त्याच्याप्रमाणे तुला विस्तारता येईल काय?
19त्याच्याशी काय बोलावे हे आम्हांला शिकव; अंधकारामुळे आम्हांला शब्दयोजना करता येत नाही.
20‘मी बोलणार’ असे त्याला सांगायचे काय? असे सांगून कोणी आपला नाश करून घेईल काय?
21आता लोकांना मेघमंडळातील देदीप्यमान सूर्यप्रकाश दिसत नाही; पण वारा सुटून ते स्वच्छ करतो.
22उत्तर दिशेकडून सुवर्णप्रभा येते, देव भयजनक तेजाने मंडित आहे.
23सर्वसमर्थ तर अगम्य आहे, त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे; तो न्याय व महान नीतिमत्ता विपरीत करीत नाही;
24म्हणून माणसे त्याचे भय धरतात; जे शहाणपणाचा अभिमान वाहतात, त्यांच्याकडे तो लक्ष देत नाही.”

सध्या निवडलेले:

ईयोब 37: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन